esakal | कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

 Congress

कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) कमी झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका (KDMC Elections) लवकरच घोषित केल्या जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा काँग्रेस (Congress) कार्यकर्ते देत आहेत. त्या दृष्टीने शनिवार (ता. ११) पासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे (Sachin Pote) यांनी ‘काँग्रेस आपल्या दारी’ हे अभियान (political campaign) सुरू केले आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत कट ऑफ कायम

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवरील निवडणूक स्वबळावर लढाव्यात, अशा सूचना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याचे संकेत देत संघटना बांधणीस सचिने पोटे यांनी सुरुवात केली आहे.

काँग्रेस आपल्या दारी या अभियानाअंतर्गत प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिवाय नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.

loading image
go to top