Raigad News: रायगडमध्ये माहितीबंदी! जिल्हा परिषद अध्यक्षांचा तुघलकी फतवा

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी काढलेल्या आदेशामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
Raigad Zilla Parishad

Raigad Zilla Parishad

ESakal

Updated on

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद विकासकामांपेक्षा एका वादग्रस्त आदेशाने चर्चेत आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश बाकडीकर यांनी काढलेल्या आदेशामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यापूर्वी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांची ही गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात मंगेश वाकडीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com