Railway News: डबे उपलब्ध नसल्याने एलटीटी थिविम एक्सप्रेस तब्बल ८ तास लेट; समर स्पेशल गाड्याचा गोधळ!

Railway News: डबे उपलब्ध नसल्याने एलटीटी थिविम एक्सप्रेस तब्बल ८ तास लेट; समर स्पेशल गाड्याचा गोधळ!

नितीन बिनेकर

Mumbai News: रेल्वेचे सीटिंग रिकामे डबे वेळेवर उपलब्ध न झाल्याने मध्य रेल्वेला प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागलेले आहे. तब्बल आठ तासानंतर मध्य रेल्वेने स्लीपर डबे जोडून गाडी एलटीटी-थिविम गाडी मार्गस्थ करण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून मध्य रेल्वेच्या कारभारावर संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे रेल्वेकडे रिकामे डबे वेळेत उपलब्ध होत नसल्याने गाड्या आठ ते दहा तास विलंबाने धावत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. (railway news latest)

ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी -थिवीम उन्हाळी विशेष एक्सप्रेस शनिवारी आपल्या नियोजन वेळेत म्हणजे रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटायला हवी होती.(01129 LTT - Thiveem Summer Special Express) मात्र, बऱ्याच वेळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस वर गाडी आलेली नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या संदर्भात रेल्वेकडून प्रवाशांना सूचनाही देण्यात येत नव्हत्या त्यामुळे प्रवासी गोंधळात पडलेले होते.(express not on time news)

काय घडली घटना ?

प्रवाशांच्या आरडाओरडानंतर ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी -थिवीम उन्हाळी विशेष एक्सप्रेस रात्री २ वाजता गाडी सुटणार असे सांगण्यात आले. परंतु,गाडी सुटली नाही त्यानंतर संतापलेल्या सर्व प्रवाशांनी एकत्र येऊन रेल्वेच्या नियंत्रण कक्षात यांसदर्भात विचारणा केली. (why was train not on time)

त्यानंतर, रेल्वे अधिकाऱ्यांना गाडी ३ वाजता सुटेल असे सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी संयम ठेवत तीन वाजेपर्यंत वाट बघितली. तरीही गाडी सुटली नाही. त्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागले. जेव्हापर्यंत ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी -थिवीम उन्हाळी विशेष एक्सप्रेस सोडत नाही. तेव्हापर्यंत एकही मेल गाडी जाऊ देणार नाही असा आंदोलनाचा पवित्र प्रवाशांनी घेतला.

तब्बल ८ तासानंतर गाडी रवाना-

प्रवाशांच्या संताप बघून रेल्वेने तात्काळ स्लीपर डब्याची जुडवाजुड केली. त्यानंतर तब्बल ८ तासानंतर पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी -थिवीम उन्हाळी विशेष एक्सप्रेस सोडण्यात आली. मात्र, या घटनेमुळे वयोवृद्ध आणि महिला प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत तसेच रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी चांगला संताप व्यक्त केलेला आहे.

रेल्वेचे नियोजन फिस्कटले ?

मध्य रेल्वेवर ४०० पेक्षा जास्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहे. मात्र, अनेक मेल एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत असल्याने वेळेवर रिकामे डबे उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे अतिरिक उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन फिस्कटले असून प्रवाशांना त्यांच्या नाक त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वेकडून उत्तर भारतात सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. मात्र, कोकण मार्गावर गाड्याची संख्या खूप कमी आहे. त्यात रेल्वेचे योग्य नियोजन नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर तासोंतास रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रेल्वेने उन्हाळी विशेष काळजी योग्य नियोजन करावे जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही.

- अक्षय महापदी,सदस्य कोकण विकास समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com