Railway: अशा प्रकारे यंदाच्या वर्षी झाले मध्य रेल्वेवर मोठे बदल; वर्ष ठरले ऐतिहासिक

Railway
RailwaySakal

Mumbai Local: मध्य रेल्वेसाठी सरते वर्षे मोठे बदल करणारे ठरले आहे. दादर स्थानकाचे फलाट सलग करणे, मेल-एक्स्प्रेस गाड्यांची गती वाढवणे असे बदल या वर्षात झाले. त्यामुळे प्रवाशांना मिळणारी सुविधा अधिक सुलभ होण्यास मदत झाली. मध्य रेल्वेच्या या बदलांचा आढावा ‘सकाळ’ने घेतला आहे.

सात फलाट इतिहासजमा

दादर स्थानकातील फलाट क्रमांक ९ डिसेंबर २०२३ पासून सलग करण्यात आले. पश्‍चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक १ ते ७ असेच ठेवण्यात आले असून मध्य रेल्वेवरील फलाटांना ८ ते १४ क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटांच्या क्रमांकावरून होणारा गोंधळ संपुष्टात आला आहे.

Railway
Mumbai Local: मुंबई लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय!

प्रवासी संख्येत वाढ

मध्य रेल्वेकडून ‘वंदे भारत’ गाड्यांच्या पाच जोड्या चालवण्यात येतात. यंदा १२११ विशेष गाड्यांच्या ६३०४ फेऱ्या चालवल्या गेल्या. चालू आर्थिक वर्षात १०३ कोटी प्रवाशांची ने-आण मध्य रेल्वेने केली आहे.

मागील वर्षी ती ९४ कोटी होती. १४५ डेमू /मेमू प्रवासी गाड्यांसह मेल/एक्स्प्रेस गाड्यांची सरासरी दैनंदिन धावण्याची संख्या आता ३७१ वर पोहोचली आहे.

वेगवान प्रवास

गती वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने २०२३-२४ मध्ये ६९७ आरकेएममध्ये १३० किमी प्रतितास वेग यशस्वीपणे वाढवला. यामध्ये इटारसी ते बल्लारशाह, इगतपुरी ते सेवाग्राम आणि पुणे ते दौंड यांसारख्या विभागांचा समावेश आहे. एलएचबी रेक असलेल्या गाड्या आता १३० किमी प्रतितास वेगाने धावत आहेत.

Railway
Mumbai Local: २.९४ हजार पर्यटकांनी केला लोकल प्रवास; रेल्वेची पर्यटन तिकीट सुसाट !

‘मेरी सहेली’

मध्य रेल्वेने ५१२ ईएमयू महिला डब्यांना इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टिमसह सुसज्ज केले आणि ४२१ ईएमयू महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी ‘मेरी सहेली’ योजना सुरू करण्यात आली आहे.

इतर सुविधा

विविध स्थानकांवर १४९ लिफ्ट, १७९ एस्केलेटर्स आणि ३८७ वाय-फाय सुविधांच्या तरतुदींसह प्रवासी सुविधा सुधारित करण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑनबोर्ड हाउसकीपिंग स्टाफसह (ओबीएचएस) ९८ आधुनिक एलएचबी रेकमध्ये ८८ जोड्या कार्यरत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना स्वच्छता आणि आराम मिळतो.

Railway
Mumbai Local Train : लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com