

रेल्वे
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : लोणावळा परिसरातील कामांसाठी रेल्वे विभागाने रविवारी (ता. ७) इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला होता. त्यामुळे दुपारी साडेतीनला येणारी उद्यान एक्स्प्रेस सायंकाळी सहाच्या सुमारास सोलापूर स्थानकावर पोचली. वंदे भारत रात्री १०.४० ऐवजी ११.१० वाजता पोचणार आहे. हुतात्मा एक्स्प्रेस १० मिनिटे उशिरा आली.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल येथून चेन्नईला जाणारी रेल्वे आठच्या सुमारास सोलापुरात अपेक्षित होती, पण ती रात्री साडेअकराला पोचणार आहे. याशिवाय काकीनाडा, कोणार्क, हैदराबाद, यशवंतपूर, विशाखापट्टणम अशा एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना देखील दोन ते तीन तासांचा विलंबाने धावत आहेत. एक्स्प्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना उशीर झाल्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पण, आठवड्यातील शक्यतो रविवारी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षित प्रवासासाठी अशी कामे केली जातात.
रविवारी लोणावळा परिसरात दिवसभर काम सुरू होते. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना विलंब होत असल्याचे रेल्वेच्या वेबसाईटवरून दिसते. पुण्यातून येणाऱ्या गाड्या सोलापूरला वेळेत पोचल्या. उद्यापासून (सोमवारी) सर्व रेल्वे गाड्या त्यांच्या वेळेत धावतील व निश्चित ठिकाणी वेळेत पोचतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंटरलॉकिंग काम म्हणजे काय?
रेल्वे विभागात इंटरलॉकिंग म्हणजे एक सुरक्षा प्रणाली आहे. ज्यातून सिग्नल, स्विच (पॉइंट्स) आणि ट्रॅक सर्किटच्या समन्वयाने रेल्वे गाड्यांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करते. परस्परविरोधी मार्गांवर गाड्यांना जाण्यापासून रोखणे आणि मानवी चुका टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक किंवा रिले-आधारित तंत्रज्ञान वापरणे, ज्यामुळे रेल्वे अपघात टळतात. ब्लॉक म्हणजे एका विशिष्ट मार्गावर एकावेळी एकाच गाडीला परवानगी दिली जाते. यामुळे एका दिवसासाठी गाड्यांना काहीसा विलंब होतो, असे सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.