esakal | मराठवाड्यात मध्यम पाऊस शक्‍य 
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तवली आहे. दीर्घ खंडानंतर मराठवाड्याच्या काही भागांत 30 ऑगस्टपासून पाऊस परतला आहे.

मराठवाड्यात मध्यम पाऊस शक्‍य 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी - मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तवली आहे. दीर्घ खंडानंतर मराठवाड्याच्या काही भागांत 30 ऑगस्टपासून पाऊस परतला आहे.

सोमवारी दिवसभर विश्रांतीनंतर रात्री काही भागात हलक्‍या सरी कोसळल्या. या पावसामुळे खरिपाला जीवदान मिळाले आहे. जलस्रोत भरण्यासाठी अजूनही सर्वदूर मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आठ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे. 

loading image
go to top