

तालुक्यातील पुनाडे, चिरनेर, जांभूळपाडा, गावठाण, रानसई, कळंबुसरे या परिसरात सफेद कांदा, वाल, चवळी, शिराळी घोसाळी तसेच इतर पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच शेवग्याचे पीकदेखील या परिसरात भरघोस येते; मात्र अचानक आलेल्या पावसाचा या पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भातशेती कापल्यानंतर ऑक्टोबरमध्ये रब्बी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत किती पीक येणार याचा अंदाज घेतला जातो. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फुले आली होती. त्यावरून वाल, चवळी यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात येतील असा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांना होता; मात्र सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
कारण या पावसामुळे आलेली फुले गळून पडली आहेत. अशीच परिस्थिती शेवग्याचीदेखील झाली आहे. त्यामुळे मार्च, फेब्रुवारी महिन्यात मिळणारे शेवग्याचे उत्पन्न मिळण्याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. तसेच पावसामुळे शेतीतील विक्रीकरिता काढलेला पेंढाही भिजला असल्याने खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.
वीटभट्टीचे अर्थकारण बिघडणार
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीटभट्टीचालकांना बसला आहे. पावसाने सुकवण्यासाठी ठेवलेल्या विटादेखील भिजल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरू होण्याला अजून उशीर होणार असल्याने मजुरांचा वाढलेला खर्च तसेच कच्च्या मालाच्या झालेले नुकसानीमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे अर्थकारण यंदा बिघडणार आहे.
भातशेती झाल्यानंतर वाल, चवळीचे पीक घेतो. या वर्षी मोठ्या प्रमाणात कडवा वाल लावला आहे; मात्र अवकाळी पावसामुळे ही फुले गळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
- तुकाराम ठाकर, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.