राज्यात पावसाची विश्रांती;  कोकणात जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.  तर कोकणासह,  मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम सरी हजेरी लावत आहे.  

पुणे -  उत्तर भारतात पावसाच्या मुसळधार सरी पडत असल्या तरीही महाराष्ट्रात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित महाराष्ट्र कोरडा होता, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पण, त्याचवेळी उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असतानाच विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम सरी हजेरी लावत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मॉन्सूनचा आस हा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे. तो अमृतसरपासून बिहारच्या भागलपूरपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे ईशान्य भारतासाठी उत्तरेतील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाचा पुरवठ्यामुळे ईशान्य, पूर्व व मध्य भारतासह विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले असून, पाऊसही पडत आहे. तर किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा निवळला असून, कोकणातही पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भ, मराठवाड्यात येत्या मंगळवारी (ता. 21) वादळी पावसाचा अंदाज आहे. उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​

पुण्यात ढगांच्या गडगडाटाह पावसाची शक्‍यता 
पुणे शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाणही 80 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत पुण्यातील शिवाजीनगर येथील वेधशाळेत 262.2 मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे 327.8 मिलीमीटर आणि लोहगाव येथे 207 मिलीमीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain rest for the last few days in most parts of the state