esakal | काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने शहरात १३ जुलेैच्या रात्रीपासून २३ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे.

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रविवारी दिवसभर सूट दिल्यानंतर सोमवारी (ता.२०) मात्र दूध, जीवनावश्‍यक वस्तू आणि औषधांची दुकाने वगळता अन्य सर्व वस्तूंची बाजारपेठ बंदच राहिली. मात्र, रस्त्यावर वर्दळ पाहावयास मिळाली. काही भागात दुपारी बारानंतर पोलिसांनी वाहने अडविण्यास सुरूवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने शहरात १३ जुलेैच्या रात्रीपासून २३ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, पहिल्या पाच दिवसात म्हणजे १९ जुलैपर्यंत औषधे आणि दूध वगळता कोणत्याही दुकानांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, रविवारी एक दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे काल दिवसभरात मटणाच्या दुकानापासून ते जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी उसळली असल्याचे चित्र होते. सोमवारपासून जीवनावश्‍यक वस्तू, दूध, औषधांची दुकाने सकाळी आठ ते बारापर्यंत खुली करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर ऍडमिट झाल्या अन् चित्रा वाघ यांनी केलं ट्विट, म्हणाल्या...​

आज सोमवारी पहिल्याच दिवशी शहर आणि उपनगरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता बहुतांशी दुकाने बंदच होती. काही भागात दुपारी बारानंतर जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेही पोलिसांनी बंद करण्यास भाग पडले. तर काही ठिकाणी ती दुपारी उशिरापर्यंत उघडी होती. मात्र १० ते १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये खुली करण्यास परवानगी देण्यात आली असल्यामुळे रस्त्यावर आज वर्दळ दिसत होती. काही ठिकाणी दुपारी बारानंतर पोलिसांनी रस्ते अडवून वाहतूक बंद केली. तर काही भागात मात्र सायंकाळपर्यंत ती सुरू होती. 

हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा​

पुणे महापालिकेने २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे रविवार पेठ आणि बोहरी आळी परिसरातील सर्व दुकाने आज बंद होती. 
- राजू पवार (सचिव, पुणे शहर व्यापारी असोसिएशन) 

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top