राज्यात मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी पाऊस झाला. तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, रविवारी आणि सोमवारी मुंबईत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर रायगड आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.