मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पूर्वेकडून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्‍चिमेकडील कोरडे वारे मध्य भारतात एकत्र येत आहेत. त्यामुळे विदर्भाच्या काही भागांसह पश्‍चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या वाऱ्यांचा प्रभाव कमी होईपर्यंत म्हणजे पुढील चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज  हवामान खात्यातर्फे वर्तविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वेकडून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्‍चिमेकडील कोरडे वारे मध्य भारतात एकत्र येत आहेत. त्यामुळे विदर्भाच्या काही भागांसह पश्‍चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या वाऱ्यांचा प्रभाव कमी होईपर्यंत म्हणजे पुढील चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने भाजपच्या आशा पल्लवित, कारण... 
 
पुण्यात तापमान वाढले
शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविले. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ०.४ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३०.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमानाच्या पाऱ्यात मात्र सरासरीपेक्षा २.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवस किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाणार असून, ढगाळ वातावरण या दरम्यान कायम राहील, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rainfall chances in central Maharashtra