राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

उडीशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता.२७) ठळक झाले होते. तर, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण भारतात वाऱ्यांचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र स.िक्रय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. तर, उद्यापासून (ता. २९) कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. 

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ११५, साताऱ्यातील हेळवाक येथे १०३, महाबळेश्‍वर येथे १०७, लामज येथे ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाने आेढ दिलेल्या मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. 

सोमवारी (ता.२७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : महाड ४६, करंजवडी ४२, नाटे ४१, खारवली ४०, गोरेगाव ४०, रोहा ४८, कोलाड ४३, पोलादपूर ४९, कोंडवी ४७, तला ५२, मेंढा ६०, मार्गताम्हाणे ५५, वाहल ४५, सावर्डे ४६, असुर्डे ४७, कळकवणे ६०, शिरगाव ७४, दापोली ४२, खेड ५३, शिरशी ४८, कुलवंडी ६१, भरणे ४१, दाभील ४२, अबलोली ४०, तरवल ४२, कडवी ४६, मुरडव ४७, फणसावणे ४४, देवळे ४३, देवरुख ४०, पाटगाव ४०, बांदा ४४, अंबोली ११५, फोंडा ५०, कडवल ४०, भेडशी ५३. 

मध्य महाराष्ट्र : धारगाव ६०, शेंडी ३०, माले ३३, मुठे ७४, पिरंगुट ३६, भोलावडे ३४, नसरापूर ३२, निगुडघर ४७, काले ६०, वेल्हा ४९, पानशेत ४४, विंझर ३१, आपटाळे ४०, बामणोली ३५, केळघर ३५, हेळवाक १०३, महाबळेश्‍वर १०७, तापोळा ९८, लामज ११७, कोतोली ३४, आंबा ४१, राधानगरी ३९, साळवण ३४, गवसे ४२, चंदगड ३८. 

मराठवाडा : अंबाजोगाई ३०, विडा ३८, मातोळा ३२, अहमदपूर ३९, किनगाव ३४, वाढवणा ३१, देवार्जन ३९, नळेगाव ३५, शेलगाव ३४, जळकोट ४०, डाळिंब ३१, नांदेड ग्रामीण ३२, लिंबगाव ४३, तरोडा ३६, मुखेड ४०, चांडोळा ३०, कंधार ३८, बारुळ ३०, माळाकोळी ३३, हदगाव ३८, तामसा ३६, चुडवा ३४, हयातनगर ३८. 

विदर्भ : बोरी ३०, विरळी ३९, लाखांदूर ४३, सालकेसा ३२, केशोरी ३४, ब्रह्मपुरी ३९, कुरखेडा ४७, पुराडा ४०, काढोली ६८, अारमोरी ३४, देऊळगाव ३८, पिसेवढथा ३६, वैरागड ३४, कोरची ३४, बेडगाव ३०, कोटगुळ ३५, देसाईगंज ६०, शंकरपूर ८०. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rainfall forecast in the state