निवडणुकांवर पावसाचे सावट! २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elections
निवडणुकांवर पावसाचे सावट! २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

निवडणुकांवर पावसाचे सावट! २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

सोलापूर : ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऐन पावसाळ्यात होणार आहेत. पण, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि १५ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

यंदाचा मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर १० ते १५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. राज्यात जूनमध्ये ९ ते १७ दिवस तर जुलै-ऑगस्ट महिन्यात १२ ते ३० दिवस पाऊस होतो. सप्टेंबरमध्येही १६ ते २७ दिवस पाऊस होतो, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर येतो, अशी पावसाळ्यात स्थिती असते. तरीही, राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नाशिक, अमरावती, उल्हास नगर अशा १४ महापालिका तर २५ जिल्हा परिषदा आणि दोन हजार ४४८ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून जून ते सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

१५ जूनपूर्वी राज्यात मान्सूनचे आगमन
केरळमध्ये २७ मेपर्यंत तर महाराष्ट्रात १० ते १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून काही दिवस लांबणीवर पडेल. पण सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही, मान्सून दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात अधिक स्पष्टता येईल.
- नीता शशिधरण, हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, पुणे, नगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, हिंगोली, धुळे, बुलढाणा, नागपूर व भंडारा या २१ जिल्ह्यांमध्ये मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक (१०० ते सहाशे मिलिमीटर अधिक) पाऊस झाला आहे. विशेष बाब म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात प्रत्येक महिन्यात किमान १० ते ३० दिवसांपर्यंत पाऊस पडतो, असेही कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Rainfall On Local Elections Above Average Rainfall In 21 Districts In Three

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top