
तीन महिन्यातील नुकसान
मार्च-एप्रिलमधील नुकसान
१३,१९४ हेक्टर
मे महिन्यातील नुकसान
४९,२२८ हेक्टर
नुकसानीचे एकूण क्षेत्र
६२,४२२ हेक्टरसोलापूर : राज्यातील मॉन्सूनपूर्व पावसामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात राज्यातील प्रमुख सात जिल्ह्यांमधील एक लाख ५६ हजार ५५ एकरावरील (६२ हजार ४२२ हेक्टर) पिके भुईसपाट झाली आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने मागवून घेतला असून शेतकऱ्यांना आता महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर भरपाई मिळणार आहे. पण, अजूनही महसूल विभागाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.