महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याऐवजी ती इंग्रजी आणि मराठीनंतर तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे, मात्र याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध केला आहे, या हिंदी सक्ती मागे आयएएस लॉबी आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. बड्या अधिकाऱ्यांना मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून त्यांच्या सोयीसाठी हिंदी भाषा लादली जातेय का असा सवाल केला राज ठाकरेंनी केला. मात्र राज ठाकरे हिंदी सक्तीबाबत आयएएस लॉबीवर निशाना साधत केंद्र सरकारचा बचाव करत आहेत का? असाही सवालही आता उपस्थित केला जात आहे.