या पोरांना मत द्या! भन्नाट नृत्य करणाऱ्या मुलांवर राज ठाकरे फिदा

डान्स शोमध्ये 'डिमॉलिशन क्रू' ग्रुप विजयी ठरावा, यासाठी सर्व मराठीजनांनी त्यांना 'व्होट' करावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले.
Raj Thackeray
Raj Thackeray सकाळ डिजिटल टीम
Updated on

सोनी वाहिनीवरच्या बहूचर्चित असलेला 'इंडियाज गॉट टॅलेंट' या डान्स रिअ‍ॅलिटी शो ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.अशात या शो मध्ये सहभागी झालेल्या नावाजलेला 'डिमॉलिशन क्रू' ग्रुप सध्या प्रसिद्धीच्या झोत्यात आहे. नुकतेच त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. यासंदर्भात स्वत: राज ठाकरे यांनी ट्वीटरवर माहिती दिले. सोबत डान्स शोमध्ये 'डिमॉलिशन क्रू' ग्रुप विजयी ठरावा, यासाठी सर्व मराठीजनांनी त्यांना 'व्होट' करावं, असं आवाहनही त्यांनी केले. (Raj Thackeray appealed to vote india's got talent fame demolition group as they went to meet him)

Raj Thackeray
घरवापसी होताच शिवाजीराव नाईकांनी केलं शरद पवारांचं कौतुक

राज ठाकरे यांनी 'डिमॉलिशन क्रू' या ग्रुपसोबतची एक फोटो पोस्ट करत त्यावर या मुलांचे तोंडभरुन कौतुक केले. ते ट्वीट द्वारे म्हणाले, "सोनी वाहिनीवरच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या 'डिमॉलिशन क्रू' या ग्रुपच्या मुलांशी काल छान गप्पा झाल्या. अंबरनाथ, बदलापूरच्या सर्वसामान्य घरांतून आलेली ही मुलं अत्यंत कष्टाने, संघर्ष करत पुढे आली आहेत. या मुलांचा जन्मच जणू नाचण्यासाठी झालाय, इतकं उत्कृष्ट ती नाचतात.

डान्स शोच्या अंतिम फेरीत पोहोचून 'डिमॉलिशन क्रू' ग्रुप विजयी ठरावा, यासाठी सर्व मराठीजनांनी त्यांना 'व्होट' करावं, हे माझं आग्रहाचं आवाहन."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com