घरवापसी होताच शिवाजीराव नाईकांनी केलं शरद पवारांचं कौतुक

महाराष्ट्राचं विकास फक्त शरद पवारचं करू शकतात-शिवाजीराव नाईक
घरवापसी होताच शिवाजीराव नाईकांनी केलं शरद पवारांचं कौतुक

सांगली: अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव नाईक यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. महाराष्ट्राचा विकास फक्त शरद पवारचं करू शकतात असेही ते म्हणाले.

घरवापसी होताच शिवाजीराव नाईकांनी केलं शरद पवारांचं कौतुक
चंद्रकांतदादांच्या आव्हानाला सतेज पाटलांचे सडेतोड उत्तर, म्हणाले...

यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्याचा विकास केवळ शरद पवार साहेब करू शकतात. आजच्या शुभदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे हे शुभचिन्ह आहे. आजच्या कार्यक्रमातून शरद पवार यांचा विचार संपूर्ण राज्यभर पसरेल असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, शरद पवार यांचे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या कामावर बारीक लक्ष असतं. आमच्या भागात नोकऱ्यांचे प्रश्न ते सोडवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली ते म्हणाले, शरद पवार साहेब विकासाची मोठी शक्ती आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नाईक यांचे स्वागत करत असताना आनंद होतोय. भाजप रोज म्हणत मंत्री फुटणार, आमदार फुटणार आम्ही बोलत नाही काम करतो. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com