Raj Thackeray Criticises EC On Campaign And Voting Process

Raj Thackeray Criticises EC On Campaign And Voting Process

Esakal

सरकारलं हवं ते निवडणूक आयोग करतंय; प्रचार संपल्यावरही मतदारांच्या भेटीची मुभा अन् 'पाडू' मशिनवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास राहिले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. नवं नोटिफिकेशन आणि पाडु मशिनवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Published on

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, प्रचार कालच थांबला आहे. मात्र प्रचार थांबताना निवडणूक आयोगानं नवं नोटिफिकेशन जारी केलं. सरकारला हवं तसं निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com