Raj Thackeray Convoy Accident: ताफ्यातील गाड्यांचा घोडेगावजवळ अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray Convoy Accident: ताफ्यातील गाड्यांचा घोडेगावजवळ अपघात

अहमदनगर : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

सदर अपघात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगावजवळ झाला असून या अपघातातील जखमींची माहिती अद्याप मिळालेली नाही. या अपघातात ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या असून त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे आणि कलाकार अंकुश चौधरी यांच्या गाड्याचं नुकसान झालं आहे.

हेही वाचा: जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखाचा पदभार

राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांचा ताफा पुण्यातून औरंगाबादकडे रवाना झाला होता. आज सकाळी १०० पुरोहितांच्या हाताने पूजापाठ करुन त्यांचा ताफा वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी थांबला होता. त्यानंतर पुढच्या मार्गावर रवाना झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे पुणे औरंगाबाद रस्त्यावर हा अपघात घडला आहे.

हेही वाचा: भाजपाच्या उधारीवर मनसेच्या सभा; महापौर पेडणेकरांचा टोला

दरम्यान राज ठाकरे यांनी भोंग्याच्या प्रश्नावर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रभर वाद पेटला आहे. राज ठाकरे हे १ मे ला औरंगाबाद आणि ५ मे ला अयोध्या येथे सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती पण दोन दिवसांपूर्वी काही अटी घालून त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. उद्याच्या सभेनंतर ते अयोध्येला रवाना होणार आहेत.

Web Title: Raj Thackeray Aurangabad Sabha Rally Accident In Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top