MNS Padwa Melava: 'पेंग्विन' हा एकच शब्द बोलून राज ठाकरेंनी अधिक भाष्य करणे टाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray avoids talking about Aditya Thackeray

MNS Padwa Melava: 'पेंग्विन' हा एकच शब्द बोलून राज ठाकरेंनी अधिक भाष्य करणे टाळले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. शिवसेना फुटीवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं अशा अनेक विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरें पासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. भाषण चालू करतानाच पहिला टोला आदित्य ठाकरे यांना लगावला ते म्हणाले, हा संपलेला पक्ष आहे का, गर्दी पाहा आणि जे म्हणाले त्यांची स्थिती काय, असं म्हणत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यानंतर मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असून देखील राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेवर बोलणं टाळलं. मंचा समोर बसलेले कार्यकर्ते पेंग्विन-पेंग्विन ओरडू लागले, मात्र राज ठाकरे यांनी हसत तो विषय टाळला.

दरम्यान राज ठाकरेंनी शिवसेना फुटीवर भावना व्यक्त केल्या

शिवसेना फुटीवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं.

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहे, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे मी शिवसेना पाहिली. ती शिवसेना मी जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली होती.

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. धनुष्यबाण बाळासाहेबांशिवाय कोणाला झेपणार नाही. एकाला झेपलं नाही दुसऱ्यांला झेपेल की नाही माहीत नाही, असे म्हणत राज ठाकरे म्हणाले.