
Raj Thackeray : "तेव्हा वेदना होत होत्या, तो पक्ष मी जगलो..." शिवसेना फुटीवर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. शिवसेना फुटीवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.
राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे मी शिवसेना पाहिली. ती शिवसेना मी जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली होती.
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. धनुष्यबाण बाळासाहेबांशिवाय कोणाला झेपणार नाही. एकाला झेपलं नाही दुसऱ्यांला झेपेल की नाही माहीत नाही, असे म्हणत राज ठाकरे म्हणाले.
माननीय बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं. २०१९ चाय विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं.आणि अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं, असे राज ठाकरे म्हणाले.
राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले.