
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच राज ठाकरे भाजपशी हातमिळणी करणार अशीही चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरेंची भेट झाल्यानंतर रंगली होती, पण आता शिंदे गटाने राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरु केले असून यासाठी एकनाथ शिंदेनी खास शिलेदाराची नेमणूक केली असल्याची सुत्रांची माहिती आहे.