Wrestlers Protest : "कुस्तीपटूंना योग्य न्याय मिळाला नाही तर..." ; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

Wrestlers Protest  : "कुस्तीपटूंना योग्य न्याय मिळाला नाही तर..." ; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला २१ तारखेपर्यंतचा वेळ दिला. यापूर्वी २८ तारखेला पोलिसांनी कुस्तीपटूंची धरपकड करत त्यांना अटक केली होती. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. तसेच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईची केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, "आज तुमचं (नरेंद्र मोदी) एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणास हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती."

"ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

Wrestlers Protest  : "कुस्तीपटूंना योग्य न्याय मिळाला नाही तर..." ; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र
Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांना पंधरा दिवसांत अटक करा; पैलवानांसह शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा / विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे, असे राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे.

"जर कुस्तीपटूंना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा", अशी विनंती राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Wrestlers Protest  : "कुस्तीपटूंना योग्य न्याय मिळाला नाही तर..." ; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र
POCSO Act : "पॉक्सो कायद्यात बदल करा"; अयोध्येतील महंत-साधू ब्रिजभूषण यांच्यासाठी एकवटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com