राज ठाकरे ट्विटरवर करतात 'या' एकमेव अकाउंटला फॉलो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ट्विटरला 267.4K फॉलोअर्स आहेत. पण ते मात्र एकमेव ट्विटर अकाउंटला फॉलो करतात. MNS Adhikrut एकमेव ट्विटर अकाउंटला ते फॉलो करतात.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ट्विटरला 267.4K फॉलोअर्स आहेत. पण ते मात्र एकमेव ट्विटर अकाउंटला फॉलो करतात. MNS Adhikrut एकमेव ट्विटर अकाउंटला ते फॉलो करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

@mnsadhikrut मनसे अधिकृत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर अकाउंट आहे. राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख असल्याने ते या खात्याला फॉलो करतात. राज हे कायम आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. तसेच, त्यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंटही आहे. यापूर्वी त्यांनी त्यांच्या सभा फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांनी आपले ट्विटर अकाउंट हे मे २०१७ मध्ये चालू केले होते. तेव्हापासून ते ट्विटरवर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत.

मोदी पुण्याला आले पण 'हे' करायला नाही विसरले

दरम्यान, MNS Adhikrut या अकाउंवरून एकूण ९९ जणांना फॉलो करण्यात आले आहे. तर, या अकाउंटचे 105.5K फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवरून माध्यमांच्या अकाउंटला तसेच, महत्वाच्या माध्यमप्रतिनीधींना फॉलो करण्यात आले आहे. मनसे अधिकृत हे अकाउंट जुलै २०१७मध्ये चालू करण्यात आलेले आहे.

Image result for raj thackeray esakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray follow MNS Adhikrut on Twitter