Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. लोक मनसेला मतदान का करत नाहीत, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी ते सभा देखील घेणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा देखील त्यांनी केली. गेली १८ वर्ष राज ठाकरेंना निवडणुकीत यश आले नाही. मात्र राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे.

मराठी माणसांचा टोल बंद करायचा असेल किंवा काही समस्या असतील तर राज ठाकरे हवे असतात. राज ठाकरे यांच्या सभेला देखील मोठी गर्दी असते पण त्यांना मतदान त्या प्रमाणात होत नाही, यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे,

राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसांनी मतं दिले आहेत, माझे १३ आमदार निवडून दिले होते. खासदारकीला, लाख सव्वा लाख, दोन लाख असं मतदान झालं आहे. मध्ये अशी एकादी फेज होते. माझी १८ वर्ष काय घेऊन बसला. १९५२ ला जन्माला आलेल्या जनसंघाला २०१४ ला बहुमत मिळालं. अटलजींच सरकार आलं पण ते अनेक पक्षांचे होते.

खरे बहुमत हे २०१४ ला मिळालं. १९५२ ते २०१४ एवढा काळ गेला. त्यांना का नाही कोणी प्रश्न विचारत? त्यांना लोकांनी मतदान का नाही केलं. १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्याती सत्ता १९९५ साली हातात दिली. प्रत्येक राजकीय पक्षाला वेळ लागला आहे, असे राज ठाकरेंनी यांनी स्पष्ट केले.  

सध्याची परिस्थिती अशी हे वडा टाकला की तळून आला पाहिजे पण मी बटाटे आणायला जाणार नाही. माझ्या हाहात बटाटा वाडा पिठात वैगरे टाकून मी आत टाकतो आणि तळून आला की खातो. पण त्यासाठी पिठं बनवा, आलं लसनाची पेस्ट करा...बटाटा शिजवा...यात कुणाला रस नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

सत्ता कशासाठी पाहिजे?

सत्ता कशासाठी पाहिजे, माझ्या दुष्टीकोणातून महाराष्ट्रासाठी सत्ता हवी असेल तर ठिक आहे. पण महाराष्ट्राचं व्हिजन काय आहे. आम्ही महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणली पण ज्याप्रकारे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहीजे त्या प्रकारे ती होत नाही.

महाराष्ट्राच्या जनतेला माझं तेच म्हणणे आहे. सगळ्यांना संधी दिली एकदा मला संधी देऊन बघा. नालायक ठरलो तर पुन्हा निवडून येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.  बोल भिडू या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. 

Raj Thackeray
Prakash Ambedkar : ‘चारशे पार’ तर रोज सभा कशासाठी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com