
मनसेच्या पाडवा मेळाव्यातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहिममध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यासमोर अनधिकृतरित्या झेंडे लावून अतिक्रमण होत आहे. ते थांबवलं नाही तर आम्हीही तेथे मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर आता या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये याची काळजी पोलिस घेत आहेत.
राज ठाकरेंनी केलं सरकारचं अभिनंदन, म्हणाले...
प्रतापगडाजवळील अफजल खानाच्या कबरी जवळ झालेलं अतिक्रमण सरकारने काढल्याने सरकारचं अभिनंदन केलं.
कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं- राज ठाकरे
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले ज्याच्या सोबत लढले त्यांच्या सोबत जात सरकार स्थापन केलं. युतीला बघून मतदान केलं त्याचं काय असा सवाल ही त्यांनी केला.
राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा तो किस्सा
राज ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंना मी एका हॉटेलमध्ये घेवून गेले त्या ठिकाणी त्यांना विचारलं सत्ता आल्यावर मुख्यमंत्री होईच उद्धव ठाकरे म्हणाले हो. पक्षाचे अध्यक्ष व्हायचंय ते म्हणाले हो, त्यानंतर आम्ही घरी आलो आणि बाळासाहेबांना हा किस्सा सांगितलं. त्यानंतर हा निर्णय घेतला.
राज ठाकरेंचं शिवसेनेवर भाष्य, म्हणाले
शिवसेने कोणाची हा वाद चालू असताना मनाला खुप वेदना झाल्या- राज ठाकरे
संदीप देशपांडेंची मनसेच्या नेते पदी निवड
मनसेची ताकत वाढली; भरत दाभोळकरांचा मनसेत प्रवेश
मनसेची ताकत वाढली भरत दाभोळकर यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
बाळा नांदगावकर यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
बाळा नांदगावकर यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही मनसे-शिवसेना युती बाबत चर्चा करण्यासाठी गेलो असतो त्यांनी मला सांगितले तुम्हीच शिवसेनेत या असं म्हणत अनेक विषयांवर त्यांनी टीका केली.
थोड्याच वेळात राज ठाकरे सभा स्थळी पोहचणार
राज ठाकरे भोंग्यांवर बोलणार
राज्यातील सगळे भोंगे अद्याप उतरले नाहीत, १० टक्के बाकी आहेत, आज राज ठाकरे यावर बोलतील, असे मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.
राज ठाकरेंनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
राज ठाकरेंच्या सभेआधीचा टीझर
राज ठाकरेंची तोफ धडाडणार; निशाण्यावर सत्ताधारी की विरोधक?
शिवाजीपार्कवर आज राज ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची उत्सुराज्यात शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान,कता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही वेळात सुरू होणाऱ्या सभेसाठी कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी जमायला सुरवात झाली आहे.
आज राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्यात शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान, वाढती महागाई, शेती मालाचा भाव या विषयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार?