राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar & Raj Thackeray

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

मुंबई: काही क्षणापूर्वीच राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ देखील त्यांच्यासोबत आहेत. सध्या सुरु असणारा एसटीचा संप हे या भेटीमागचे कारण आहे.

हेही वाचा: मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावती, मालेगावमध्ये हिंसक वळण

राज ठाकरे एसटी कामगारांची काय बाजू मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या भेटीनंतर ते आंदोलनाबाबत काय भूमिका मांडतात, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. राज ठाकरे यांनी परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा न करता थेट शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व असल्याचं मानलं जातंय.

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आणि कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी पुन्हा आवाहन करतो की, त्यांनी कामावर जावं, नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष आपला वापर करेल, मात्र तुमचं नुकसान भरुन निघणारं नाही. सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकावण्याचं काम करतायत, त्यांची जबाबदारी कोण घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांनी विवेकाने विचार करावा. कोरोनाच्या काळातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आणखी नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.

loading image
go to top