मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम | Mumbai water supply update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : पवई (Powai) येथे वैतरणा (2400 मिली मीटर व्यास ) आणि उर्ध्व वैतरणा (2750 मिली मीटर व्यास) यामधील 900 मिली मीटर व्यासाच्या छेद जल वाहिनीला गळती (Water pipeline leakage) लागली आहे. महापालिकेच्या जल विभागाने (BMC) गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले असून शनिवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. जलवाहिनीची गळतीमुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्यावर 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजेपर्यंत परिणाम होणार आहे. तरी या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा: लसीकरण करूनही झालेला संसर्ग दिशादर्शक ठरणार; BMC कडून प्रकरणांचा अभ्यास

या विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम

जी दक्षिण विभाग -

वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग

जी उत्तर विभाग -

माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी

डी विभाग -

लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग

ए विभाग -

कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी

loading image
go to top