Raj Thackeray: जानेवारी महिन्यात बोंबलायचंच आहे; राज ठाकरेंकडून मध्यावधी निवडणुकीचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray: जानेवारी महिन्यात बोंबलायचंच आहे; राज ठाकरेंकडून मध्यावधी निवडणुकीचे संकेत

उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या कार्यकर्त्यांना, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, तयारी लागा, अशा सुचना दिल्या होत्या. दरम्यान आता, मनसेपक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. मात्र, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील की महानगर पालिकेच्या निवडणुका लागतील हे त्यांनी स्पष्ट न केल्याने संभ्रम वाढला आहे.(Raj Thackeray Mid-term elections Mumbai maharashtra politics crisis)

एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारीला लागा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

तसेच, घशाला सध्या आराम देतोय. जानेवारी महिन्यात निवडणुका लागतील. त्यामुळे बोंबलायचंच आहे. घसा आपला असतो, तर गळा लता मंगेशकर अशा मोठ्या लोकांचा असतो. अस खोचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

आधी उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे यांनी देखील जानेवारी महिन्यात निवडणूक होणार असल्याचे सांगितल्याने जानेवारीमध्ये निवडणुका पार पडतील असे संकेत मिळत आहे. मात्र, या निवडणुका मध्यावधी असतील की महानगर पालिकेच्या असतील या बाबत राज ठाकरे यांनी थेट सांगितलेले नाही. त्यामुळे नेमक्या निवडणुका कुठल्या या बाबत संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.