
Mumbai News: दादर येथील शिवाजी पार्क मैदानात टाकण्यात आलेल्या मातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. येथील माती वॉर्ड ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी उचलावी अन्यथा सर्व माती उचलून वॉर्ड ऑफिसमध्ये टाकण्याचा इशारा उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.
शिवाजी पार्कमधून उडणाऱ्या धूळ आणि मातीमुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येवर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मनसेचे संदीप देशपांडे हे नगरसेवक असताना भूमिगत टाक्यांच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून या ठिकाणी धूळ नियंत्रणाचा प्रयत्न केला गेला.