Raj-Uddhav Thackeray : 'राज आणि उद्धव' एकत्र आले तर...

राष्ट्रवादीची महिन्यापूर्वी वर्धापन दिनाच्या निमित्तानं झालेली बैठक त्यामध्ये विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मांडलेली भूमिका खूप काही सांगणारी होती.
Raj Thackeray MNS Supremo Uddhav Shivsena Chief
Raj Thackeray MNS Supremo Uddhav Shivsena Chief esakal

Raj Thackeray MNS Supremo Uddhav Shivsena Chief : राज्याच्या राजकारणात बड्या बड्या म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांनी केलेला खेळखंडोबा अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरतो आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी होणारी बंडखोरी, सत्तापरिवर्तन, वेगवेगळ्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाया आणि पक्षांतर्गत झालेली फूट यामुळे वेगळेच चित्र समोर आले आहे.

राष्ट्रवादीची महिन्यापूर्वी वर्धापन दिनाच्या निमित्तानं झालेली बैठक त्यामध्ये विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मांडलेली भूमिका खूप काही सांगणारी होती. आता मला विरोधीपक्षनेते पदातून मुक्त करा आणि वेगळी जबाबदारी द्या. असे त्यांनी सांगितले होते. राजकारणात कोणतीही भूमिका सरळ, थेट किंवा स्पष्टपणे व्यक्त करायची नाही, निदात भाषणातून तरी नाही असा अलिखित संकेत आहे. दादांनी तो पाळला होता.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद हवे होते. ते त्यांना मिळावे म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही सगळ्यांसाठी वेगळा इशारा होता. ज्यांना कळला त्यांनी त्यांच्यासोबत धाव घेत थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यात काही शरद पवारांचे कट्टर समर्थक असणाऱ्या प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भूमिकेविषयी मात्र अनेकांना कोड्यात टाकले आहे. हे नेते तिकडे कसे काय गेले, त्यामागे काय राजकारण आहे, हा पवारांचा तर डाव नाही ना, त्यांनीच पुन्हा गुगली तर टाकली नाही ना, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

यासगळ्यात मात्र आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा होतेय. ती म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांची. यांच्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स आणि मेसेज सोशल मीडियावर येत आहेत. मुंबईत तर राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे. आता महाराष्ट्राला तुमची गरज आहे. अशी फ्लेक्सबाजी सुरु झाली. राज ठाकरे यांनी येत्या काळात आपण बैठक घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी उद्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यातून ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. खासदार राऊत यांनी तर त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत विरोधी पक्षांवर तोफ डागली आहे. अजित पवारांनी उचलेलं पाऊल या गोष्टी होणारच होत्या. यावेळी त्यांनी मोदींच्या सभेचा संदर्भ दिला. येत्या काळात मुख्यमंत्री बदलणार असून शिंदेंच्या जागी अजित पवार मुख्यमंत्री झालेले दिसतील. असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात राज आणि उद्धव यांची एकत्र येण्याची वेळ झाली असे म्हटले जात आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव यांनी राज्याचा राजकारणात एकत्र यावे असे म्हटले जात आहे. त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील तशी इच्छा आहे. मात्र यात दोन्ही पक्षप्रमुख काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सध्याची परिस्थिती पाहता जर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील जनेतेची पसंती त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा तज्ञांचा अंदाज आहे. राज्यातील राजकारणात वेगळेपण, नवीन संधी, आणि ठाकरे यांच्याविषयीचा असलेला भावनिक बंध ही त्यामागील कारणे असू शकतात.

Raj Thackeray MNS Supremo Uddhav Shivsena Chief
Sharad Pawar : गडी पुन्हा एकटा निघाला! 82 वर्षाचा 'तरुण' आज गुरूच्या साक्षीने करणार मोठा एल्गार!

थोड्यावेळापूर्वी पुण्यातील मनसेचे पदाधिकारी वसंत मोरे यांनी हिंमत असेल तर मनसेच्या वाघाला विरोधीपक्षनेता करा असे म्हटले आहे. त्यामुळे मनसेकडून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे. राज यांनी तर नजीकच्या काळात सुप्रिया सुळे देखील केंद्रामध्ये गेल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही.

महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्ष जे काही राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणं होतं चाललंय. या नेत्यांना मतदारांशी काही घेणदेण नाही. मला असं वाटत आहे की या सर्वाचा विचार नागरिकानं करणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray MNS Supremo Uddhav Shivsena Chief
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com