
Latest Kokan News: मनसेचे तालुका सचिव दीपक यशवंत पार्टे (वय ५२) यांचा आज सकाळी घरालगत असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला.
पार्टे यांचे नाधवडे सरदारवाडी येथे घर आहे. तेथे ते कुटुंबासमवेत राहतात. आज सकाळी त्यांनी घरातील किरकोळ कामे केली. त्यांचा पुतण्या मोहित पार्टे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरालगत असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता, विहिरीत ते तरंगताना दिसून आले.