Raj Thackeray to Join MVA? Sanjay Raut’s Statement Sparks Buzz
esakal
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि शिवसेनेची ( उद्धव ठाकरे गटाची) युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वत: पाच ते सहा वेळा ऐकमेकांना भेटलेत. पण जर दोन्ही पक्षांची युती झाली? तर महाविकास आघाडीचं काय होणार? राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.