Raj Thackeray : 'चॅनेलचे माईक चालू असतात हे भान ठेवून...', मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा शिंदे सरकारला सल्ला

Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबईः मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेमधला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातला संवाद व्हायरल झाला. त्यामुळे सरकारवर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत.

राज ठाकरेंनीही व्हायरल व्हिडीओवरुन सरकारला सल्ला दिला आहे. आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे जात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. त्यावर राज ठाकरेंनी समाधान व्यक्त करुन भविष्यातील मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Raj Thackeray
Kishor Kadam : ''होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय.. आपण बोलून निघून जायचं...''; सौमित्रची कविता व्हायरल

राज ठाकरेंचं ट्वीट

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.

राज ठाकरे पुढे म्हणतात, आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.

''गेले १७, १८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनेल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.'' असा चिमटा राज ठाकरेंनी काढला आहे.

Raj Thackeray
INDIA: इंडिया आघाडीकडून न्यूज अँकर्सवर बहिष्काराचा निर्णय; अर्णव गोस्वामी, सुधीर चौधरीसह 14 जणांचा समावेश

दरम्यान, सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वीच्या व्हायरल संवादामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आपलं काय.. आपण बोलायचं आणि निघून जायचं. त्यांच्या या विधानाला दोन्ही उपमुख्यमंत्री साद देतात. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो संपादित केलेला असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com