Jitendra Awhad I 'देवाची चर्चा सोडा, लोकशाहीच्या मंदिरातील ह्या देवाचा श्वास कोंडलाय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad

'लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा'

'देवाची चर्चा सोडा, लोकशाहीच्या मंदिरातील ह्या देवाचा श्वास कोंडलाय'

काल राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे जाहीर सभा पार पडली आहे. त्यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बूस्टर डोस सभा घेत विरोधकांना टोला लागवला. औरंगाबाद येथील मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेते सडेतोड उत्तर दिली आहेत. दरम्यान, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत विरोधकांना टोला लगावला आहे.

ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, देव कणाकणात आहे त्याची चर्चा सोडा! लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा! ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थीमुळे, महागाईचा डोंगर त्या देवावर कोसळला आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यांनी या काव्यपंक्ती करत विरोधकांनावर टीकेची झोट उठवली आहे.

हेही वाचा: 'कुणी कितीही आदळआपट केली तरी महाराष्ट्रात जातीय दंगली भडकणार नाहीत'

दरम्यान, काल राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे भोंग्यासंदर्भात वक्तव्य करताना 'हा कायद्याचा विषय आहे, हे प्रश्न कायद्यानेच सुटतील, कोर्ट, हायकोर्ट, पोलिस व्यवस्था यासंबंधित निर्णय घेतील. तुम्हाला आता काही काम नसल्यामुळे स्वत:च्या राजकीय हितासाठी तुम्ही हे विषय काढत आहात आणि देशातील वातावरण खराब करत असल्याची टीका केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीवरून शिवसेनेला डिवचले होते. मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले. आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला होता. यावर आज खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतित्त्युर दिले आहेत.

हेही वाचा: राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'

Web Title: Jitendra Awhad Criticized To Raj Thackeray And Fadnavis Yesterday Statement Inflation Situation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top