Vidhan Sabha 2019 : नाशिकसारखा विकास कोणत्याही राज्यात नाही : राज ठाकरे

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 October 2019

परप्रांतीयांचे लोंढे ठाण्यात

- जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा

डोंबिवली : नाशिकमधील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मतं दिली आणि तिथं मनसेची सत्ता आली होती. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात शहराचा विकास केला. नाशिकसारखा विकास इतर कोणत्याही राज्यात झालेला नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले.

डोंबिवली येथे आयोजित जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 हजार 500 कोटींची आश्वासनं दिली होती. मात्र, आता त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे. राज्यात जिकडं जावं तिकडं खड्डेच खड्डे आहेत. या सरकारला अजून खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही. शहरातील मुलभूत सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. डोंबिवली म्हणजे स्मार्ट लोकांची बकाल सिटी झाली आहे. मात्र, जेव्हा आमच्याकडे नाशिकमध्ये सत्ता होती तेव्हा मनसेने जो विकास केला इतर कोणत्याही राज्यात असा विकास झाला नाही.

परप्रांतीयांचे लोंढे ठाण्यात

राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा परप्रांतीयांवर निशाणा साधला. परप्रांतीयांचे सर्वांत जास्त लोंढे ठाणे जिल्ह्यात आहेत. 10 वर्षांनंतरची स्थिती राहण्यासारखी नसेल, असेही ते म्हणाले. 

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. मात्र, आता आम्हाला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावयाची आहे. त्यामुळे आम्हाला साथ द्या, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray praising Nashik Municipal Corporation Development Maharashtra Vidhan Sabha 2019