'MIMची अवलाद येऊन कबरीवर डोकं ठेवते अन् आम्हाला लाजा नाहीत': राज ठाकरे

यांच्या अशा राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळी करू लागल्यात." असा टोला त्यांनी लावला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal

पुणे : राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. औरंगाबादमध्ये ओवैसीने औरंगजेबाच्या कबरीचं केलेलं दर्शन, उत्तरप्रदेशमधले ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामुळे झालेल्या चर्चेविषयी त्यांनी या सभेत विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे.

(Raj Thackeray Pune Sabha)

पुण्यातील झालेल्या सभेत त्यांनी आपल्या पायाच्या दुखण्याच्या कारणामुळे आयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसीवर फटकेबाजी केली आहे. हे सगळं घडत असताना आपण थंड लोण्याच्या गोळ्यासारखं बसलो आहोत असाही टोला लावला.

Raj Thackeray
ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं भारताशी जुनं नातं

"आमच्याच महाराष्ट्रात MIM ची अवलाद येते आणि आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवते आणि आम्हाला लाज, शरम काहीच वाटत नाही." असं म्हणत "आमच्या शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो तर काय बोलणार? तुमच्या सोयीसाठी इतिहास का बदलताय?" असा सवाल त्यांनी केला आहे.

"शरद पवार म्हणतात की, अफजलखान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो आपला धर्म वाढवण्यासाठी आला होता, आता यावर काय बोलावं? यांच्या अशा राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करू लागल्यात." असा टोला त्यांनी शरद पवारांवर लावला आहे.

Raj Thackeray
लग्नाची मिरवणूक उठली जीवावर; अपघातात 8 ठार 3 गंभीर जखमी

"मला वाटलं ओवैसी ज्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवल्यावर महाराष्ट्र पेटून उठेल पण तसं काही झालं नाही. महाराजांना मारण्यासाठी विजापूरहून आलेल्या अफजलखानाची कबर पहिल्यांदा चार पाच फुटातच होती ती आता पंधरा ते वीस हजार फूटात झालीय, अफजलखानाची मशिद तिथे उभी राहिलीय, त्यासाठी देणग्या येत आहेत. ह्या देणग्या देणाऱ्या अवलादी कोण आहेत?" असाही प्रश्न त्यांनी केला आहे. "या घटना घडत असताना आपण थंड पडलो आहोत, आम्ही थंड लोण्याचे गोळे आहोत." असं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com