Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...

पुणे - महाराष्ट्राचं राजकारण दिशाहिन झाल्याचं चित्र आहे. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलिकडे काही दिसत नाही. यावरून सातत्याने माध्यमाच्या कार्यपद्धतीवर टीका होते. मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं. यावेळी राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर देखील ते स्पष्ट बोलले. ( Raj Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Governor controversy: शिवरायांचा पुन्हा एकेरी उल्लेख? राज्यपाल कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता!

राज ठाकरे म्हणाले, राजकीय स्थिती एवढी लयाला गेली की हे राजकारण नव्हे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणं, महापुरुषांबद्दल बोलणं, कोणी कशावरही बोलायला लागल, कोणीही इतिहास तज्ज्ञ होतायत. कारण हे दाखवायला बसले आहेत.

महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. राणे काय बोलले, राऊत काय बोलले, हेच सुरू आहे. मी काहीही बोलत नाही. शरद पवार म्हणतात, मध्येच येतात आणि बोलतात. यामुळेच मी बोलत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा: Chitra Wagh : "खुल्या समाजात उघडा नंगानाच..." ; महिला आयोगाच्या नोटिशीवर चित्रा वाघ यांचे जाहीर उत्तर

एकाच विशिष्ट राज्याला प्राध्यान्य देण्यात येत का, यावर राज म्हणाले हे मी आधीच बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण गुजरातचे आहोत, म्हणून केवळ गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधानांना शोभत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. संघराज्य आहे, तर मग सर्व राज्यांना न्याय द्यायला हवा. मी २०१४ मध्येच म्हटलो होतो की, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यांकडे लक्ष द्यावे, असंही राज म्हणाले.

हेही वाचा प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

टॅग्स :Raj Thackeray