Raj Thackeray on Nasrapur Case
esakal
पुण्यातल्या नसरापूरमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातो आहे. या आरोपीवर कठोर करावाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.