
Raj Thackeray: "स्वतःच्या स्वार्थासाठी अन् पैशासाठी दिसेल तो…''; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटाध्यक्ष मेळावा कार्यक्रमात बोलताना जोरदार फटकेबाजी केली. राज्यातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यादरम्यान आजत्या सभेत राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, काल परवा पर्यंत मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडेलेल, मुख्यमंत्री पदावर असाताना तब्येतीचं कारण सांगून… असं म्हणतं राज ठाकरेंनी मान डोलावत उद्धव ठाकरेंची नक्कल करून दाखवली. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरलवली, आता फिरतायत सगळीकडे… यांच्यासारखा वागणारा मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी अन् पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं, असले धंदे मी नाही करत,असा टोला राज ठाकरे यांनी लगवला.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंनी राज्यपालांना चांगलंच झापलं. ज्यावेळी महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात होते त्यावेळी आमचं धोतर का बोललं नाही. ते आज शिवाजी महाराजांवर बोलत आहेत. त्यांचं वय काय बोलता काय? मोठ्या पदावर बसला आहात म्हणून मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही अशा शब्दांत ठाकरेंनी राज्यपालाचा समाचार घेतला.
गांधी नेहरूंची बदनामी करणं थांबवा
जवाहरलाल नेहरू यांचे फोटो व्हायरल करून त्यांची बदनामी केले जाते. भाजपने गांधी-नेहरूवर टीका करायची आणि परत काँग्रेसने सावरकरांवर टीका करायची. पण हे थांबवलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.