
Veer Savarkar : 'सावरकरांवर बोलयाची लायकी आहे का...'; राज ठाकरेंचा राहुल गांधींना संतप्त सवाल
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटाध्यक्ष मेळाव्यात राज ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी पाहायाला मिळाली. वीर सावरतक यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून त्यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत. सावरकरांविषयी बोलायची त्यांची लायकी आहे का? असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
वीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला, ते म्हणाले की, "सभोवतालचं वातावरण बिघडलं आहे, आपण एकमेकांना जाती-पातीमधून बघतोय. महापुरूषांची बदनामी करणं सुरू आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात आले. ते गुळगुळीत मेंदूचा आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागून आरडी बर्मन बोलतायत तेच कळत नाही."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, अरे गधड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवर बोलयाची? असा सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केला. पुढे ते म्हणाले की, म्हणे सावरकरांना माफी मागीतली.. दयेचा अर्ज.. स्टॅटर्जी नावाची गोष्ट असते, त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही बघणार फक्त दयेचा अर्ज, अरे सर सलामत तो पगडी पचास ना. मग पन्नास वर्षांची शिक्षा झालेला माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून बाहेर येतो आणि पुन्हा हंगामा करतो, हे डोक्यात चालू असेल, त्याला स्टॅटर्जी म्हणातात, असे राज ठाकरे म्हणाले. ज्याला स्टॅटर्जी समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, एखादी चांगली गोष्टी घडणार असेल तर घडवण्यासाठी खोटे बोलावं लागलं तर बोला, हे कृष्णनीतीमध्ये सांगितलेले आहे. शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगाला गड-किल्ले दिले. गड-किल्ले म्हणजे चितळेची बर्फी होती का. त्यावेळी मावळे थकलेले होते, आर्थिक अडचणी होत्या अशी परिस्थिती होती. त्यामुळे आलेल्या सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते. त्यामुळे गडकिल्ले फक्त लिहून द्यायचे होते. ते घेऊन तरप जाणार नव्हते. परिस्थिती निवळली की ते परत घेऊ, याला स्ट्रॅटेजी म्हणतात. हे ज्याला समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा, असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान आज गोरेगाव येथील नेस्को मैदानात राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांचा मेळवा घेतला, यावेली त्यांनी राज्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर फटकेबाजी केली. राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.