प्रबोधनकारांच्या पुस्तकांवरुन राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल; म्हणाले.... | Raj Thackeray Sabha News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Sharad Pawar

प्रबोधनकारांच्या पुस्तकांवरुन राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल; म्हणाले....

औरंगाबाद : दररोज जे टेलिव्हिजनवर चाललय ते आपलं महाराष्ट्र आहे का? समाजसुधारक, विचारवंत सर्वाधिक महाराष्ट्राने दिले. आपण महाराष्ट्राचे काय केले. आम्ही काय शिकवतोय तरुणांना. याकडे आमचेच लक्ष नाही. राज ठाकरे यांचं भाषण आहे. हल्लागुल्ला करा. आमच्या हातात काहीच लागत नाही. हे सर्व राजकारण्यांना हवे आहे. माझी दोन भाषणे झाली. तर सर्व फडफडायला लागले आहेत, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधकांवर केले. आज रविवारी (ता.एक) औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar) म्हणतायत की समाजामध्ये मी दुही मजवतोय. (Raj Thackeray Sabha News Raj Ask Question To Sharad Pawar Over Prabhodankar Thackeray's Books)

शरद पवारांनी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सभेत उल्लेख केला आहे का? यूट्यूबर त्यांची भाषणे आहेत. ती पाहा. नास्तिक म्हटल्याबरोबर त्यांना लागलं, झोंबलं. देवाचे फोटो वगैरे दाखवले, असा टोला ठाकरे यांनी पवारांना लगावला. तुमची कन्याच लोकसभेत बोलल्या की माझे वडील नास्तिक आहेत. मी माझ्या आजोबांचे पुस्तके वाचली आहेत. तुम्ही त्यांची पुस्तक नीट वाचा. अपेक्षितच वाचलं, संदर्भासहित वाचा, असा दाखला प्रबोधनकार ठाकरे यांचा देत राज यांनी शरद पवारांवर टीका केली. पवार यांना खास करुन त्यांच्यासाठी आजोबांच्या पुस्तकातील संदर्भ आणले आहेत. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढचं करु नका.

राष्ट्रवादी जन्मानंतर जातीवाद सुरु झाला. वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना शरद पवार यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. मी जात पाहून पुस्तक वाचत नाहीत. मी कोणाकडेही जात पाहून जात नाही. तुम्ही सत्तेत होता तर, त्यांनी जेम्स लेनला खेचून आणायचे होते, अशी टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.