Vidhan Sabha 2019 : पुण्यात नाही, पाण्यात राहता म्हणून सांगा : राज ठाकरे

टीम ई-सकाळ
Thursday, 10 October 2019

पुण्यात बुधवारी माझी सभा अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसामुळे रद्द करावी लागली. पुण्याची वाट लावून टाकली आहे. आता तुम्ही पुण्यात नाही पाण्यात राहता असे सांगा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगाविला.

मुंबई : पुण्यात बुधवारी माझी सभा अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसामुळे रद्द करावी लागली. पुण्याची वाट लावून टाकली आहे. आता तुम्ही पुण्यात नाही पाण्यात राहता असे सांगा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगाविला.

ईडीच्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीर सभेत बोलताना दिसले. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आज मुंबईत त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुण्यातील परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले.

Pune Rains : पुणेकरांनो, आजही लवकर घरी जा, कारण...

राज ठाकरे म्हणाले, की पुण्यात अर्धा-पाऊण तास पाऊस पडला पण पुरती वाट लावून गेला. शहराची वाट लावून टाकली आहे. बसवर झाड कोसळल्याने पीएमपी ड्रायव्हरला जीव गमवावा लागला. सगळीकडे लाईट गेल्या होत्या. अंधारात बसलो होतो. मी कोणाशी बोलतोय हे कळत नव्हते.

लग्नाचं प्रपोजल नाकारलं; गर्लफ्रेंडचा न्यूड फोटो केला अपलोड

ठाण्यातही तिच परिस्थिती आहे. खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे. शहराचा विचका झाला आहे. राजकारणी येऊन आश्वासने देतात आणि तुम्ही विश्वास ठेवता. पुण्यासारखे शहर विस्कळीत होत असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray says About Pune Maharashtra Vidhan Sabha 2019