
शरद पवारांना हिंदू शब्दाची ॲलर्जी : राज ठाकरे
औरंगाबाद : पूर्वीही देशात जातपात होत्या. त्याचे राजकारणही केले जात होते. मात्र, जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला तेव्हापासून देशात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमणात केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.
शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमी सांगतात की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांचा आहे. परंतु, आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे गेले आहेत. मी शरद पवारांना नास्तिक म्हटल तर त्यांना झोंबले. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
शरद पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. ते फक्त फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतात. ते नेहमीच जातीपातीचे राजकारण करतात. मी जात मानत नाही. माझा जातीपातीत विश्वास नाही. मी कोणत्याही ब्राह्मण समाजाची बाजू इथे मांडण्यासाठी आलोला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
तुम्हाला अपेक्षित असेलली प्रबोधनकारांची पुस्तक तुम्ही वाचली आहेत. माझ्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी जे लिहून ठेवले आहे ते परिस्थितीला धरून आहे. ते व्यक्ती सापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारे नव्हे. आजोबा हिंदू धर्म माणणारे माणूस होते. धर्माच्या चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणारे होते, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
मी म्हटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) हे काही प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ लागले आहे. मागच्या सभेतही मी त्यांच्यावर जातीपातीचा आरोप केला होता. माझी दोन भाषणे झाल्यावर हे सगळे फडफडायला लागले. शरद पवार म्हणाले की, ते दुही माजवत आहे. देशासाठी हे योग्य नाही. मात्र, तुम्ही जातीपातीचा जो खेळ मांडला आहे तेव्हापासून दुही माजत आहे, असे उत्तर राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिले.