Dharmendra Hospitalised : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून डिस्चार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Veteran actor Dharmendra admitted to hospital

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल (hospital) करण्यात आले आहे. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना शनिवारीच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. या संदर्भात रविवारी (ता. १) देओल कुटुंबीयांच्या जवळच्या एका व्यक्तीने ही माहिती दिली. धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता सनी देओलने रविवारी रुग्णालयात जाऊन वडिलांची भेट घेतली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. (Veteran actor Dharmendra admitted to hospital)

धर्मेंद्र काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर होत चालली असल्याची माहिती समोर आली आहे. काळजी करण्यासारखे कारण नाही, असे सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज -

धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिरी झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहेत. आलिया भट्ट-रणवीर सिंग या चित्रपटात जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

८६ वर्षीय बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल (hospital) करण्यात आले होते. धर्मेंद्र काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. यापूर्वीही २०१० मध्येही धर्मेंद्र यांना अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ते चंदीगडच्या रुग्णालयात दाखल होते.

२००७ च्या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये धर्मेंद्र (Dharmendra) त्यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल सोबत एकत्र येणार आहेत. त्याचा नातू (सनीचा मुलगा) करण देओल देखील २००७ च्या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सामील होणार आहे. बॉलिवूडचे हीटमॅन अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांनी अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ड्रीमगर्ल हेमा मालिनी त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, आहाना देओल, विजेता देओल आणि अजेईता देओल ही सहा मुले त्यांना आहेत.