
राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून सुरू झालंय. या अधिवेशनात विधानभवन परिसरात शुक्रवार, १७ जुलैला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विधानभवनात अशा घटनेमुळं आता विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सरकारला धारेवर धरलंय. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोस्ट करत या हाणामारीनंतर महाराष्ट्राची काय अवस्था झालीय असा प्रश्न पडल्याचं म्हटलंय.