महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वर्धापन दिन मेळाव्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “एकदा अटक करून दाखवा,” असा थेट इशारा देत त्यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि रायगडच्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. शेकापचा हा मेळावा ऐतिहासिक ठरला, कारण यावेळी राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत एकाच व्यासपीठावर आले.