राज ठाकरेंकडून नूपूर शर्माचं समर्थन; म्हणाले ओवेसी...| Raj Thackeray supports Nupur Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Nupur Sharma

राज ठाकरेंकडून नूपूर शर्माचं समर्थन; म्हणाले ओवेसी...

मुंबई - राज्यातील नाट्यमय सत्तातरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच राज यांनी भाजपच्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं. (Raj Thackeray news in Marathi)

हेही वाचा: राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; म्हणाले, हा माणूस...

राज म्हणाले की, मध्यंतरी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषीत मोहम्मद यांच्याविषय़ी काही तरी विधान केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. वास्तविक पाहता माफी मागण्याची गरज नव्हती. जे काय त्यांनी ऐकलं होतं ते त्या बोलल्या. ओवेसी आपल्या देवदेवतांवर वादग्रस्त टीका करतात. ते कधी माफी मागतात का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. काही देश देव-देवतांचा अपमान करतात, त्यांनी कधी माफी मागितली का असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: त्यादिवशी कळलं होतं काहीतरी विचित्र घडतयं; नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

राज पुढं म्हणाले की, हिंदुत्व की हिंदुत्ववाद यावर प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मी हिंदु आहे. माझ्या धर्मावर तुम्ही जाल तर मी हिंदु म्हणून अंगावर येईल. जर तुम्ही मराठी नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर येईल असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

Web Title: Raj Thackeray Supports Nupur Sharma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaRaj Thackeray
go to top