राज यांचा CM शिंदेंना चिमटा; शिवधनुष्य झेपेल की नाही ही शंका - Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : राज यांचा CM शिंदेंना चिमटा; शिवधनुष्य झेपेल की नाही ही शंका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

धनुष्यबाण बाळासाहेबांशिवाय कोणाला झेपणार नाही. एकाला झेपलं नाही दुसऱ्यांला झेपेल की नाही माहीत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.

राज ठाकरे म्हणाले, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ही चार पाच टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार

मी सांगतो तुम्हांला नारायण राणेंनी पक्ष सोडलाच नसता. माझ्या मनातही नव्हतं की पक्ष काढायचा मी बाळासाहेंबासमोर काय पक्ष काढणार?. अडीच वर्षापुर्वी जे काही झालं त्याचा मतदारांनी विचार करायाला पाहिजे. अली बाबा आणि चाळीस जण गेले. ते उद्धव ठाकरेंना कंटाळून गेले. कोविडच्या काळात उद्धव ठाकरे कोणाला भेटत नव्हते. आता अचनाक बाहेर पडू लागले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.