"मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा फोन आला, अन्..." ;  बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं! - Bala Nandgaonkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bala Nandgaonkar

Bala Nandgaonkar : "मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा फोन आला, अन्..." ;  बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं!

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे मनसेचा पाडवा मेळावाही आज होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यावेळी भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हल्लाबोल केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

बाळा नांदगावकर म्हणाले, २०१४ साली शिवसेनेची भाजपसोबत युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. त्यांनी आपल्याला एकत्र यावे लागले. त्यावेळी राज ठाकरे यांनी मला आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांना बोलावून सांगितले की मातोश्रीवरुन फोन आला आपल्याला एकत्र यावे लागले. त्यावेळी आम्ही सर्व तयारी केली होती.

मात्र त्यावेळी तुम्ही आम्हाला फसवले. शेवटच्या वेळेपर्यंत तुम्ही आम्हाला एबी फॉर्म दिले नाहीत. तुम्हाला भीती होती की राज ठाकरे भाजपसोबत जातील, तुम्हाला छोटा भाऊ नको होता. राज ठाकरे स्वत:च्या शैलिने महाराष्ट्र बांदू शकतात, ही भीती तुम्हाला होती, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

राज ठाकरेच महाराष्ट्राला हवे आहेत. आधीचं नेतृत्व कसं फेल्युअर गेलं. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी त्यांनी कसं फसवलं आहे? मला अनेक प्रश्न पडले आहेत. जर राज ठाकरेंना शिवसेना आमच्या जुन्या पक्षाची धुरा दिली असती तर महाराष्ट्रात काय घडलं असतं विचार करा, असे बाळा नांदगावकर म्हणाले. 

बाळासाहेबांविषयी बोलणारी आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करणारी ताई चालते. दाऊदशी व्यवहार करणारे लोक चालतात. बाळासाहेब ठाकरेंना कोण बाळासाहेब हे विचारणारे खासदार चालतात. मात्र भाऊ राज ठाकरे चालत नाहीत, असे बाळा नांदगावकर उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.